मालवण (प्रतिनिधी)
निवडणूक आयोगा मार्फत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून यात मतदार नावे, नोंदणी या संबंधित व इतर प्रक्रिया – तपासणी बाबत आयोगाचे BLO लवकरच घरोघरी जाऊन माहिती संकलन करणार आहेत. काँग्रेसचे नेते खासदार व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उठवलेल्या आवाजानुसार निवडणूक आयोगाने देखील आता या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून विधानसभा नुसार BLA 1 आणि बूथ लेवल नुसार BLA 2 सदस्य घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर फॉर्म नोंदणी चालू असून मालवण तालुका काँग्रेस तर्फे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे BLA 2 साठी फॉर्म भरण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी दिली आहे.
BLA 2 साठी नोंदणी करण्यासाठी तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडीस यांनी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत फॉर्मचे वाटप करण्यात आले. हे फॉर्म भरून घेण्यासाठी देवानंद लुडबे आणि महेंद्र मांजरेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. जिल्हा परिषद गटानुसार तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फॉर्म भरून घेतले. गुरुवारी दिवसभरात ५४ फॉर्म भरले असून येत्या दोन दिवसात तालुक्यातील शंभर टक्के बूथ BLO नेमण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जेम्स फर्नांडिस यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, ज्येष्ठ पदाधिकारी श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे, मधुकर लुडबे, ओबीसी तालुकाध्यक्ष प्रवीण आचरेकर, तालूका उपाध्यक्ष महेंद्र मांजरेकर, चंदन पांगे, समीर आंगणे, बाबा मेंडीस, पराग माणगावकर, माजी नगरसेविका सौ. सुमेधा धुरी, महिला तालुकाध्यक्षा प्राची माणगावकर, शहर महिला अध्यक्षा सौ. रुपाली फर्नांडिस, अमृता मोंडकर, स्नेहल मेथर, लक्ष्मीकांत परुळेकरआदी पदाधिकारी उपस्थित होते
BLA-2 (Booth Level Agent-2) म्हणजे काय ?
BLA हा संबंधित राजकीय पक्षाचा बूथस्तरावरील अधिकृत प्रतिनिधी असतो. मतदार यादी पुनरिक्षण, नव्या मतदारांची नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती, पत्ता बदल यांसारख्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे, मतदार यादीतील त्रुटी निदर्शनास आणून देणे तसेच निवडणूक आयोगाच्या बूथस्तरीय अधिकाऱ्यांशी (BLO) समन्वय साधणे ही BLA-2 ची प्रमुख जबाबदारी असते. यामुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यास मदत होते.





