मालवण, दि. प्रतिनिधी
कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी बॅच २००२-२००३ सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला पाच संगणक संचांची देणगी प्रदान करण्यात आली. ही देणगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात संगणक ज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, तसेच वराडकर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही देणगी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी प्रशाळेचे शिक्षक बाळकृष्ण वाजंत्री, शाळेचे लिपिक जयवंत पेडणेकर यांच्यासह माजी विद्यार्थी श्री. संजय जाधव, श्री. दत्ताराम गावडे, श्री. विलास गावडे, श्रीमती जया महाभोज, श्रीमती लतिका गुराम, श्री. अभिजीत जाधव, श्रीमती श्रद्धा तोरणे, श्रीमती अचला मोरजकर, श्री. पराग महाभोज, श्री. सिद्धेश नाईक, श्री. हेमंत पाताडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सौ. श्रेया सुकाळी, शिक्षकेतर कर्मचारी श्री. हाडये, सौ. सुप्रिया नाईक आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल संस्थेच्या आणि प्रशाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.







