मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४. ७३ टक्के लागला. या कॉलेजमधून परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या ९५ विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
भंडारी ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत लीनेश प्रेमानंद तारी (३७९) हा विध्यार्थी प्रथम आला असून हिना दीपक म्हापणकर ही ३४४ गुण मिळवून द्वितीय आणि गौरवी अमोल गावकर ही ३४३ गुण मिळवून तृतीय आली
या ज्युनिअर कॉलेज मधून कला शाखेत पार्थ साईनाथ मेस्त्री हा ४३९ गुण मिळवून प्रथम तर श्रेया संतोष गावकर ही ४३४ गुण मिळवून द्वितीय आणि श्रीहरी गुरुनाथ केळूसकर ३४० गुण मिळवून तृतीय आला तसेच वाणिज्य शाखेत सृष्टी पंकज दिघे ही विद्यार्थीनी ४९२ गुण मिळवून प्रथम तसेच वेदिका दिनेश निकम (४७५ गुण ) आणि वैष्णवी पांडुरंग सावंत याने ४७३ गुण मिळवीत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावीला
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर,ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे







