मालवण (प्रतिनिधी)
मालवण मेढा येथील शंकर मंदिर नजीकचे रहिवासी किशोर विठ्ठल जोशी (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवेत ते कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.







