मालवण दि प्रतिनिधी
मालवण एज्यूकेशन सोसायटी संचालित ना. अ. दे. टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवणचा बारावी परीक्षेचा निकाल ९६.८६ टक्के लागला. या कॉलेजमधून बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या २५५ विद्यार्थ्यांपैकी २४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या कॉलेजमधून वाणिज्य शाखेतील निखिल नंदकुमार भुर्के याने ५३७ गुण मिळवीत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
टोपीवाला ज्युनिअर कॉलेजमध्ये कला शाखेतून दीप्ती प्रदीप शिंदे (५०१) हिने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक – निशा समीर पाटकर (४७३), तृतीय क्रमांक – मिताली दीपक मसुरकर (४६९) यांनी मिळविला. वाणिज्य शाखेतून निखिल नंदकुमार भुर्के (५३७) याने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक – वैष्णवी दत्ताराम सावंत (५२७), तृतीय क्रमांक – रुपल सतीश धुरी (५०१+५) यांनी मिळविला. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक अर्थ परेश कुशे (५२४) याने मिळविला. तर द्वितीय क्रमांक स्मित प्रसन्नकुमार मयेकर (५०२), तृतीय – कैवल्य सागर मिसाळ (४८८) यांनी मिळवीत यश प्राप्त केले.
तर एम. सी. व्ही. सी. (व्होकेशनल) मध्ये सुहानी शिवराम पालव (४६१) हिने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक – मिताली विनय परब (४३२), तृतीय क्रमांक – सखाराम रवींद्र कदम (४२५) यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.







