मालवण तालुक्यातील तारकर्ली वायरीबांध येथे श्री गणपत तारी यांच्या निवासस्थानी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती उत्सव गुरुवार, २० मार्च रोजी भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थांच्या कथांचे वाचन व प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता श्रींच्या महाआरतीला प्रारंभ होणार असून दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद व तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता ‘भक्ती स्वरगंधा मालवण’ यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता श्री विनोद सातार्डेकर यांचे स्वामी समर्थ चरित्रावर कीर्तन होईल. तसेच रात्री ९ वाजता श्री भालचंद्र केळूसकर यांचे सुश्राव्य भजन होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







