मालवण प्रतिनिधी
आंगणेवाडी विकास मंडळ, आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने आयोजित निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ, मालवण यांनी विजेतेपद पटकावले, तर आंगणेवाडी महिला कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले.
या स्पर्धेत एस. ए. फाउंडेशन महिला कबड्डी संघ, मालवण यांना तृतीय, तर यंग स्टार महिला कबड्डी संघ, कणकवली यांना चतुर्थ क्रमांक मिळाला. यशस्वी संघांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ही स्पर्धा निमंत्रित महिला संघांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विनिता साठे (आंगणेवाडी संघ), साक्षी निकम (यंग स्टार, कणकवली), रिद्धी हडकर (जय गणेश, मालवण) आणि दुर्वा राणे (एस. ए. फाउंडेशन, मालवण) यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्यांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून पंकज राणे, प्रथमेश आढाव, प्रियंका कोरगावकर, महेश सावंत, हरिश्चंद्र साळुंखे, नितीन हडकर आणि सूरज परब यांनी काम पाहिले. ही स्पर्धा मॅटवर खेळविण्यात आली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला आंगणेवाडी विकास मंडळाचे सचिव काका आंगणे, तसेच अनंत आंगणे, विद्या आंगणे, सिताराम (बाळा) आंगणे, गजानन आंगणे, दत्तप्रसाद पेडणेकर, राष्ट्रीय कबड्डीपटू भरत आंगणे, सचिन आंगणे, तुषार आंगणे, तनुराज आंगणे, सोमा आंगणे, कुणाल आंगणे, प्रतीक आंगणे, रोहित आंगणे, सागर आंगणे, प्रथमेश आंगणे, दिनेश आंगणे, देवा आंगणे, तन्मय आंगणे, गणेश आंगणे, गोविंद आंगणे, दीपक आंगणे, प्रमोद आंगणे, सुधीर आंगणे, विशाल आंगणे, भास्कर आंगणे, बाबा आंगणे, सतीश आंगणे, समीर आंगणे आणि राजू आंगणे यांच्यासह आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्यकर्ते, आंगणेवाडी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिव काका आंगणे यांनी सांगितले की, अशा निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. भविष्यात आंगणेवाडीत कबड्डीसह विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील विविध खेळांतील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडी विकास मंडळ सातत्याने प्रयत्नशील राहतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले. जय गणेश, मालवण संघाची खेळाडू रिद्धी नितीन हडकर हिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल तिचा अनंत आंगणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या निमंत्रित स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेतील सर्व खेळाडू व संघ व्यवस्थापकांसाठी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.







