मालवण (प्रतिनिधी)
इस्कॉन या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्य शिक्षण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय महेश परब याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या बँगलोर भेटीसाठी निवड झाली आहे.
भगवद्गीता व तिचा जीवनातील उपयोग या विषयावर इस्कॉन संस्थेमार्फत ही ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली होती. यात भंडारी हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. यामध्ये तन्मय परब याने सुयश मिळविले असून त्याची इस्रो बँगलोर भेटीसाठी निवड झाली आहे. त्याला भंडारी हायस्कुलचे शिक्षक एस. ए. अवसरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तन्मय परब याच्या या यशाबद्दल इस्कॉन संस्थेतर्फे त्याचा कणकवली बांधकरवाडी येथील श्रीकृष्ण मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
तन्मय याच्या या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटी (मालवण ) मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एच बी तिवले , पर्यवेक्षक आर डी बनसोडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.







