Retired Mumbai police officer and Malvan’s daughter-in-law Kshama Madhukar Redkar won multiple gold, silver, and bronze medals at the National Master Games in Nashik and has been selected for the International Master Games 2026 in Thailand.
मालवण (दि. प्रतिनिधी):
नाशिक येथे संपन्न झालेल्या नॅशनल मास्टर गेम्स या स्पर्धेत मुंबईच्या सेवानिवृत्त महिला पोलीस अंमलदार आणि मालवणच्या स्नुषा सौ. क्षमा मधुकर रेडकर यांनी नेत्रदीपक कामगिरी करत धावणे, रिले व कबड्डी अशा विविध क्रीडा प्रकारात सुवर्ण, रजत व कांस्य पदके पटकावली आहेत. या कामगिरीमुळे थायलंड येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मास्टर गेम्स २०२६ या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नॅशनल मास्टर गेम्स मध्ये क्षमा रेडकर यांनी विविध क्रीडा प्रकारात आपली चमक दाखवली. महिला रिले स्पर्धेत सुवर्णपदक तसेच कबड्डी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. तर ४०० मीटर धावणे मध्ये रजत पदक, ८०० मीटर धावणे मध्ये रजत पदक, ५००० मीटर धावणे मध्ये रजत पदक, मिक्स रिले मध्ये कांस्य पदक मिळविले. तसेच जीतो – समृद्धी रन टू क्युअर मॅरेथॉन २०२६, नेव्ही मॅरेथॉन, टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन या स्पर्धांमध्येही सहभाग घेत उत्तम कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांची थायलंड येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मास्टर गेम्स साठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची व गौरवास्पद असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







