Nagendra Yuvraj Tari, a Class 5 student of Bhandari A.S.O High School, Malvan, secured special merit in the Maharashtra Mathematics Teachers’ Association exam and earned a place in the district merit list.
मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य’ परीक्षेत मालवणच्या भंडारी ए.सो हायस्कूलचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कु.नागेंद्र युवराज तारी याने ‘विशेष प्राविण्य’ मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. कु नागेंद्र हा आता ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.
कु. नागेंद्र तारी याला प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका पी जी मेस्त्री आणि ए ए वाईरकर यांनी मार्गदर्शन केले कु. नागेंद्र तारी याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एच . बी. तिवले ,संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, स्कुल कमिटी चेअरमन सुधीर हेरेकर आणि संस्था पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.







