Shri Rameshwar Fishermen Cooperative Society, Malvan Dandi, distributed gifts to its members from the profit earned in the financial year 2024-25. The event was attended by local fishermen leaders and dignitaries.
मालवण | प्रतिनिधी
मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी तर्फे सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मच्छिमार नेते छोटू सावजी, अखिल महाराष्ट्र कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मिथुल मालंडकर, श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा अध्यक्ष वसंत गावकर, मच्छिमार नेते प्रदीप मोर्जे, सीमाव रापण संघ देवबागचे सदस्य नादार तुळसकर, आबा वाघ तसेच संस्थेचे मच्छिमार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष जगदीश एकनाथ खराडे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
भेटवस्तू स्वीकारण्याचे आवाहन
३१ मार्च २०२५ पर्यंत नोंद झालेल्या सभासदांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत भेटवस्तू स्वीकारून जाव्यात, असे आवाहन अध्यक्ष जगदीश खराडे यांनी केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत विजय जोशी, संचालक प्रविण मेस्त, जीवन भगत, पंकज सादये, मुणाली कोयंडे, रुपेश साळगांवकर, संतोष ढोके, तुषार आचरेकर, रविंद्र चांदेरकर, दिलीप पराडकर, अर्चना आचरेकर, अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सचिव सौ. सतेजा वायंगणकर यांनी आभार मानले.







