Mahayuti candidate Sonali Sunil Ghadigaonkar intensifies election campaign in Kirlos village with a grand rally and door-to-door outreach in Malvan.
मालवण, दि. प्रतिनिधी :
आडवली–मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांच्या निवडणूक प्रचाराला किर्लोस गावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ग्रामदैवत श्री देवी पावणाई–रामेश्वर मंदिरात देवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. गावोगावी महायुतीची प्रचारयंत्रणा जोमाने राबविण्यात येत असून किर्लोस गावातून महायुतीला बहुमताचे मत मिळेल, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हा सचिव गणेश बाक्रे यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली घाडीगावकर यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत डोअर-टू-डोअर प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा घेतला. महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत सौ. सोनाली घाडीगावकर या ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रचार सभेत बोलताना गणेश बाक्रे म्हणाले की, “सौ. सोनाली घाडीगावकर यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड ही ग्रामदैवत श्री देव रामेश्वराच्या आशीर्वादानेच झाली आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ तसेच तरुण पिढी तन्मयतेने प्रचारात झोकून देऊन काम करत आहे. शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी आणि विकासाचे विचार घराघरांत पोहोचले आहेत. विरोधी पक्ष सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन स्वप्ने पाहत असला, तरी मतदार त्यांचे स्वप्न धुळीला मिळवतील. येत्या ९ तारखेला विजयाचा गुलाल शिवसेना महायुतीच उधळणार, हे आता निश्चित झाले आहे.”
या प्रचार रॅलीत उमेदवार सौ. सोनाली घाडीगावकर, सुनील घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, सुशांत घाडीगावकर, बाळा लाड, अभिमन्यू लाड, सुनील सदाशिव घाडीगावकर, विनोद भावे, विलास भावे, माजी पोलीस पाटील प्रकाश भावे, गुरुनाथ चव्हाण, प्रकाश किर्लोसकर, सागर घाडीगावकर, कमलेश घाडीगावकर, संतोष भावे, हर्षद घाडीगावकर, प्रशांत परब यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.







