Konkan Railway to run special trains between Madgaon and Lokmanya Tilak Terminus from Feb 7 to 10 for Anganewadi Shri Bharadi Devi yatra devotees.
मालवण, दि. प्रतिनिधी :
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. देवी भराडीच्या दर्शनासाठी कोकणात येणाऱ्या भाविक व चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 01004 (मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस) ही विशेष गाडी ७ व ९ फेब्रुवारी रोजी धावणार आहे. ही गाडी मडगाव जंक्शन येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे पोहोचेल.
तर गाडी क्रमांक 01003 (लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जंक्शन) ही विशेष गाडी ८ व १० फेब्रुवारी रोजी धावणार आहे. ही गाडी मुंबई येथून सकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांमध्ये एकूण २२ डबे असून त्यापैकी २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर डबे असतील. त्यामुळे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात येणाऱ्या भाविक, चाकरमानी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने भाविकांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.








