Shiv Sena–BJP Mahayuti candidates intensify door-to-door campaign in Achara ZP constituency. Ganesh Tondvalkar, Deepak Surve and Varsha Sambari receive strong public support ahead of Sindhudurg ZP–Panchayat Samiti elections.
मालवण | प्रतिनिधी
आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार मोहीम राबवत मतदारांशी थेट संवाद साधला. आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दिपक सुर्वे तसेच आचरा जिल्हा परिषद उमेदवार वर्षा मांगरीश सांबारी यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत विकासाचे मुद्दे मांडले. या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तिन्ही उमेदवारांच्या विजयाबाबत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीच्या माध्यमातून जोरात रंगत असताना, भाजपा ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकसंघपणे प्रचार करत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
घरोघरी भेटी, थेट संवादावर भर
मालवण तालुक्यात सर्वच मतदारसंघांत महायुतीचा प्रभावी प्रचार सुरू असून, घरोघरी भेटी देत मतदारांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक मागण्या ऐकून घेतल्या जात आहेत. आचरा मतदारसंघातही उमेदवारांनी स्थानिक प्रश्न, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता व युवकांसाठी संधी यांसारख्या मुद्द्यांवर भर देत विकासाचा आराखडा मांडला.
“विकासासाठी महायुतीच हवी” – नागरिकांचा सूर
“विकासकामांसाठी महायुतीच हवी” असा सूर मतदारांमध्ये दिसून येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. जनतेकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दिपक सुर्वे आणि जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी हे तिघेही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.







