A massive turnout marked the Shiv Sena–BJP–NCP Mahayuti campaign rally in Achra, Malvan, as candidates and party workers received strong public support. The market area echoed with pro-alliance slogans ahead of the Zilla Parishad and Panchayat Samiti elections, reflecting growing momentum for Mahayuti in the region.
मालवण | प्रतिनिधी :
आचरा विभागात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचा विजय असो”, “येवून येवून येणार कोण…? महायुती शिवाय आहे कोण!” अशा जोरदार घोषणांनी आचरा बाजारपेठ दुमदुमून गेली.
मच्छीमार्केटपासून निघालेली ही प्रचार रॅली आचरा तिठ्यावरून शिवसेना प्रचार कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दीपक सुर्वे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे, आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, जेरोन फर्नांडिस, अभय भोसले, भाऊ हडकर, जयप्रकाश परुळेकर, रुपेश पाटकर, संतोष मिराशी, चावल मुजावर, पंकज आचरेकर, विजय कदम, ज्ञानदेव पाटील, अशोक बागवे, शशिकांत नाटेकर, उदय घाडी, संजय केळूस्कर, दिलीप कावले, मंदार सांबारी, मांगिरीष सांबारी, सचिन हडकर, रुपेश हडकर, किशोर आचरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या रॅलीला आचरा, चिंदर, त्रिंबक, वायंगणी, तोंडवळी, बांदिवडे परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. रॅलीमुळे आचरा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रचार रॅलीनंतर बोलताना जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी म्हणाल्या की, महायुतीला मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा विजयाचा संकेत आहे. हाच उत्साह मतदानाच्या दिवशी मतदान पेटीतून दाखवून आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.







