मालवण | प्रतिनिधी :
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा यांच्या वतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत कु. दिव्या नितीन गावकर (आचरा) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कु. नंदिनी परेश बाईत (रामगड) हिने, तर तृतीय क्रमांक कु. नुर्वी गिरीश शेटगे (आचरा) हिने मिळविला. उत्तेजनार्थ कु. उर्वी विनोद आचरेकर (आचरा), कु. श्रीश परेश तारी (आचरा) आणि कु. धम्मतेजा पल्लव कदम (आडवली) यांना गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, तसेच संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
सहभागी सर्व स्पर्धकांना पुस्तके व रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण सौ. अनघा कदम (शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, आचरा) व अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले, तर आभार अर्जुन बापर्डेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महेश बापर्डेकर, सौ. समृद्धी मेस्त्री व श्री. स्वप्नील चव्हाण यांनी सहकार्य केले.






