मालवण | प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांबाबत चर्चा तसेच निवडणूक नियोजन करण्यासाठी मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाजारपेठ, मालवण येथील हॉटेल मालवणी हेरिटेज येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, विविध सेलचे तालुकाध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय., ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच इतर सर्व सेलचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. याशिवाय लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांच्याशीही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस संबंधित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा मालवण तालुका निवडणूक प्रभारी अरविंद मोंडकर आणि मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी केले आहे.






