विरार : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धा आज विरार महाविद्यालय, विरार (मुंबई) येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील चार झोनचे संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये कोकण झोन संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथमच तृतीय क्रमांक पटकावला. विशेष बाब म्हणजे या संघामध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तब्बल १० विद्यार्थिनींचा समावेश होता. त्याचबरोबर स.ह केळकर महाविद्यालय, देवगड येथील ६ विद्यार्थिनी देखील कोकण झोन संघातून सहभागी झाल्या होत्या.
आज सकाळी झालेल्या निर्णायक सामन्यात कोकण झोन संघाने ठाणे संघावर मात करत ब्राँझ मेडल आपल्या नावावर केले. या ऐतिहासिक यशामुळे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे नाव मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासात कोरले गेले आहे.
या संघाला श्री संदीप पेडणेकर व श्री ज्ञानेश केळुसकर यांनी उत्कृष्ट कोचिंग दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी संघभावना, शिस्त आणि जिद्द दाखवत हे यश संपादन केले.
या उत्तुंग यशाबद्दल जिमखाना विभाग, डॉ. हंबीरराव चौगले, प्राचार्य प्रा. के. के. राबते, सर्व प्राध्यापकवर्ग, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री साईनाथ चव्हाण, सचिव श्री चंद्रशेखर कुशे, ॲड. श्री समीर गवाणकर, उर्वरित सर्व पदाधिकारी, नॉन-टीचिंग स्टाफ, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






