मालवण (प्रतिनिधी):
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली येथे आयोजित शिक्षक व अधिकारी / कर्मचारी विभागस्तरीय स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर विभागीय (कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी) रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत कट्टा वराडकर हायस्कूलचे समीर चांदरकर सर यांनी सादर केलेल्या ‘डिजिटल शिक्षण’ या विषयावरील रांगोळीने विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या विभागस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागातील एकूण २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. समीर चांदरकर सर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कट्टा वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिकांनी समीर चांदरकर सर यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याशिवाय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे प्राचार्य आदरणीय कांबळे सर व संपूर्ण टीमनेही या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.






