मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ उमेदवारांचा समावेश असून, अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबीयांना संधी देण्यात आली आहे.
रविवारी रात्री उशिरापर्यंत मातोश्री येथे उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारांची भेट घेऊन त्यांना एबी फॉर्म दिले. हे सर्व उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या यादीत माजी खासदार व पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश विनायक राऊत यांना प्रभाग क्रमांक ८९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू यांना प्रभाग क्रमांक ५४, आमदार हारून खान यांची कन्या सबा हारून खान यांना प्रभाग क्रमांक ६४, तर माजी आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या सुप्रदा फातर्पेकर यांना प्रभाग क्रमांक १५० मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाची यादी- (Shivsena UBT Candidate List BMC Election 2026)
- प्रभाग क्रमांक 54- अंकित प्रभू
- प्रभाग क्र. 59- शैलेश फणसे
- प्रभाग क्र. 60- मेघना विशाल काकडे माने
- प्रभाग क्र. 61 सेजल दयानंद सावंत
- प्रभाग क्र. 62 झीशान चंगेज मुलतानी
- प्रभाग क्र. 63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर
- प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान
- प्रभाग क्रमांक 40- सुहास वाडकर
- प्रभाग क्रमांक 206- सचिन पडवळ
- प्रभाग क्रमांक 93-रोहिणी कांबळे
- प्रभाग क्र. 100 साधना वरस्कर
- प्रभाग क्र. 156 संजना संतोष कासले
- प्रभाग क्र. 164 साईनाथ साधू कटके
- प्रभाग क्र. 168 सुधीर खातू वार्ड
- प्रभाग क्र. 124 सकीना शेख
- प्रभाग क्र. 127 स्वरूपा पाटील
- प्रभाग क्र- 89 गितेश राऊत
- प्रभाग क्र- 141 विठ्ठल लोकरे
- प्रभाग क्र – 142- सुनंदा लोकरे
- प्रभाग क्रमांक 137- महादेव आंबेकर
- प्रभाग क्र- 138- अर्जुन शिंदे
- प्रभाग 167 – सुवर्णा मोरे
- प्रभाग 150- सुप्रदा फातर्फेकर
- प्रभाग क्र 95 – चंद्रशेखर वायंगणकर
- प्रभाग क्र 215- किरण बाळसराफ
- प्रभाग क्र 218- गीता अहिरेकर
- प्रभाग क्र 222- संपत ठाकूर
- प्रभाग क्र 225- अजिंक्य धात्रक
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)
- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
- मतदान- 15 जानेवारी 2026
- मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026






