महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव तसेच भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले असून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राजन गावंड यांच्यासह भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राम शिंदे, जनसंपर्क प्रमुख राज ठाकूर, मनसेचे जिल्हा सचिव ॲड. शैलेंद्र करले, भिवंडी मनसे विभाग अध्यक्ष श्रीनाथ भैरी, अनिल पवार, राजू प्रेस्थान यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच ठाणे जिल्हा प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीचे जिल्हा सचिव कुणाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम पाटील, यश शिंदे, हनुमंत भुरके, मानवता सेवा संघाचे पदाधिकारी शिव वाघेरा, प्रतीक्षा वाघेरा, प्रियांका वाघेरा, हर्षल वाघेरा, तसेच अनिता जाधव, सरिता चारु, प्रतिभा चित्ते, शरद शिंदे यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेनेचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचे चित्र आहे.






