मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपट वितरण तसेच स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र वितरण सोहळा सोमवार, दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता प्रशालेच्या रंगमंचावर उत्साहात संपन्न होणार आहे.
या प्रसंगी टोपीवाला हायस्कूलचे ख्यातनाम माजी विद्यार्थी डॉ. प्रसाद जनार्दन वायंगणकर यांना स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपट प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रशालेचे दोन कर्तबगार माजी विद्यार्थी प्रशांत रवींद्रनाथ खोबरेकर व इरावती किशोर पटवर्धन यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्राने गौरविण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुदेश बलवंत मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. शिक्षण, सेवा आणि कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन टोपीवाला हायस्कूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





