गोवा | प्रतिनिधी
गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक उद्या पार पडणार असून उत्तर व दक्षिण गोव्यातील एकूण ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २२६ उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भविष्य सुमारे ८.६ लाख मतदार ठरवणार आहेत.
उत्तर गोव्यातील २५ मतदारसंघांसाठी १११ उमेदवार तर दक्षिण गोव्यातील २५ मतदारसंघांसाठी ११५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यातील सुमारे ४० मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळत असून निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे ६,५०० मतदान कर्मचारी व ४,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या निवडणुकीची मतमोजणी २२ डिसेंबर रोजी करण्यात येणार असून त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.






