सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार परेश राऊत आणि समीर तुकाराम म्हाडेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत होत असून पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परेश राऊत आणि समीर तुकाराम म्हाडेश्वर हे दोघेही पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच लोकहिताच्या विविध विषयांवर त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामाची तसेच संघटनात्मक योगदानाची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर दोन्ही पत्रकारांनी राज्यातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकार सुरक्षा, संघटना अधिक मजबूत करणे आणि पत्रकार कल्याणासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परेश राऊत आणि समीर तुकाराम म्हाडेश्वर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







