जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार; संघटन मजबुती व महिलांच्या राजकीय सहभागावर भर
मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्त्यांमुळे पक्षसंघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
नवीन नियुक्तींमध्ये पूजा करलकर यांची महिला तालुका समन्वयक, माधुरी जावकर यांची तालुका सह-समन्वयक, रश्मी परुळेकर यांची उपतालुका संघटक, राधिका मोंडकर यांची शहर संघटक, तर गौरी मयेकर, योगिता गावकर, माधुरी प्रभू आणि आकांक्षा शिरपूटे यांची मालवण उपशहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्त्यांचा उद्देश पक्षसंघटना अधिक बळकट करणे, महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे हा असल्याचे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. नियुक्तीपत्र प्रदान करताना त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात पक्षवाढ, संघटन मजबुती, जनसेवा तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात नव्या पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितिन वाळके, महिला आघाडीच्या दीपा शिंदे, युवती जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, महेंद्र म्हाडगुत, महेश जावकर, उमेश चव्हाण, तृप्ती मयेकर, अनिता गिरकर, योगेंद्र गावकर, निलेश दुदवडकर, रवी तळाशीलकर, रवी मिटकर, अन्वय प्रभू, राका रोगे, ॲड. सुमित जाधव, सुशील तारी, बंड्या सरमळकर, गणपत आडिवरेकर, तपस्वी मयेकर, राजा शंकरदास, मनोज मोंडकर, किशोर गावकर, पॉली गिरकर, किरण चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, वासुदेव गावकर, सुप्रिया मडये, सुरेश मडये यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.




