मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील वरची तोंडवळी येथील लहू रामचंद्र केळूसकर यांच्या ‘मॅजेस्टीक’ रिसॉर्टवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे माडाचे झाड कोसळून रिसॉर्टचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
वरची तोंडवळी येथे लहू केळूसकर यांचे मॅजेस्टीक नावाचे रिसॉर्ट असून सध्या पावसाळी कालावधीमुळे ते बंद ठेवण्यात आले आहे. गेले काही दिवस वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या रिसॉर्टच्या शेजारील जागेतील माड कोसळून तो रिसॉर्टवर पडला. या दुर्घटनेत रिसॉर्टच्या दोन रूमचे पत्र्याचे छप्पर, सिलिंग फॅन, चिऱ्याची भिंत व इतर साहित्याचे नुकसान झाले. रिसॉर्ट बंद असल्याने स्थानिकांनी या घटनेची माहिती लहू केळूसकर यांना दिल्यावर केळूसकर यांनी बुधवारी रिसॉर्टकडे जात नुकसानीची पाहणी केली. या दुर्घटनेत केळूसकर यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.







