पोईप : (वार्ताहर)
मसुरे येथील माता काशीबाई महादेव मेमोरियल चारिटेबल ट्रस्ट आणि भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे परिसरातील शाळांमधील इयत्ता दहावी मध्ये एक ते तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव तसेच विविध परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मसुरे भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मर्डे च्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
ज्येष्ठ कामगार नेते व भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक जयवंत परब यांच्या जन्मदिन स्मरणार्थ या विशेष वार्षिक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प. अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष श्रीराम परब, डॉ.अनिरुद्ध मेहंदळे, समर्थ सहकारी पतपेढी मसुरेचे शाखा व्यवस्थापक संतोष सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ.वीणा मेहंदळे, केशव भोगले, विश्वनाथ परब, जगदीश चव्हाण, संदीप हडकर, पूजा ठाकूर, जि. प.सदस्य क्षमा हडकर, माजी जि. प. अध्यक्ष सरोज परब, माजी जि.प.अध्यक्ष अशोक सावंत, मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, रमेश पाताडे सर, एम.आय. टी. एम. कॉलेजचे शिक्षक झाटये, लक्ष्मी सावंत, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर यांनी केले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी एमआयटीएम कॉलेजच्या वतीनेही गुणवंतांचा गौरव करण्यात आला. संग्राम प्रभूगावकर यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी चैतन्य भोगले, सूरज मसुरकर, नेहा शिंगरे, अथर्व कुशे, विराज परब, निधी पेडणेकर, यश हरेश तेंडोलकर, विजय मेस्त्री, आर्या मुणगेकर, रिया मुणगेकर, मंथन राणे, भार्गवी प्रभुदेसाई, मयुरी चव्हाण, प्रतिक्षा येसजी, आदर्श तांबे, साहिल मसुरकर, ऋग्वेद बागवे, वैष्णवी पालव, मुकुंद मुळये, तनिष्क मुळीक, अथांग आंगणे आणि प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, आजी-माजी विद्यार्थी, पालक ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली म्हाडगुत यांनी केले.





