मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी योग दिनाचे महत्त्व सांगताना योगासनाचे आपल्या शरीरासाठी व मनासाठी होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. योग अभ्यासक शिक्षक प्रवीण पारकर यांनी विद्यार्थ्यांकडून व सर्व कर्मचाऱ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली. शेवटी शासनाच्या मैत्री उपक्रमांतर्गत आनापान ध्यानधारणा घेतली. याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक ए. ए. शेर्लेकर, पांडुरंग राणे शिक्षकेतर कर्मचारी पी. व्ही. खोडके, रविराज जाधव आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.





