मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर हायस्कूल येथे शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन जागृत उन्नती मंडळ, त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर रुग्णांची तपासणी, निदान, मोफत औषधोपचार आणि चष्मा वाटप करणार आहेत.
रुग्णांची तपासणी, निदान व औषधोपचार, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणे, नेत्र तपासणी व चष्मा वाटप, मोफत औषधांचे वाटप, गर्भाशय कर्करोगाच्या (मर्नीत् हिम) निदानासाठी स्त्रियांची महिला डॉ क्टरांकडून तपासणी, संधीवात आणि मणक्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध, बालरोग तज्ज्ञांकडून बाल रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
त्रिंबक गाव आणि पंचक्रोशीतील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक डॉ. सिद्धेश सकपाळ, त्रिंबक ग्रामपंचायत, जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन आले प्रतिष्ठान मुंबई, रॉयल मालवणी, सिंधुदुर्गतर्फे करण्यात आले आहे.







