मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळ संचालित लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळा या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून सानिका सुनील तोंडवळकर ही ८८. ८० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे.
या परीक्षेत २० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. कस्तुरी शांताराम बागवे हिने ८२. ४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर नेहाली विठोबा खवणेकर हिने ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, शालेय समिती सभापती चंद्रशेखर कुशे, मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, संस्थाचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
गेली आठ वर्षे प्रशालेचा निकाल शंभर टक्के लावल्याबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार नंदन देसाई आणि सहकार्यवाह संदेश कोयंडे यांनी मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे आणि शिक्षक वर्गाला धन्यवाद देतानाच यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत यश संपादन करून शाळेतून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, डीएड कॉलेजचे प्राचार्य श्री. माळी, शिक्षिका वैशाली चव्हाण, नंदन घोगळे, पालक तोंडवळकर आदी उपस्थित होते.







