पोईप दि वार्ताहर
पोईप येथील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या प्रशालेतून रिया रवींद्र घाडीगावकर हिने ४३८ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर वेदिका मंगेश परब हिने ४१६ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि लक्ष्मी धनंजय नाईक हिने ३९० गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, मुख्याध्यापक श्री. कुंभार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.







