मालवण (प्रतिनिधी)
मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या प्रशालेतून प्रज्ञा अरुण पवार हिने ४१७ गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला. तर मानसी महादेव धुरत हिने ३४७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि पूजा अनिल परसे हिने ३४५ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.







