सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार, 30 मार्च रोजी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 31 मार्च आणि 1 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
🔸 महत्त्वाच्या सूचना:
- विजा चमकत असताना संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
- मोबाईल व दूरध्वनीचा वापर टाळावा.
- घराबाहेर पडणे टाळावे; बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- विजेचे खांब व उंच झाडांपासून दूर राहावे.
- मोकळ्या जागेत असल्यास वाकून बसावे.
- धातूच्या वस्तूंपासून अंतर ठेवावे.
- ‘दामिनी अॅप’ डाउनलोड करून वीज पडण्याची पूर्वसूचना घ्यावी.
- पावसात झाडाखाली उभे राहू नये किंवा मोबाईलवर बोलणे टाळावे.
- शक्यतो पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा.
🔸 आपत्कालीन संपर्क क्रमांक:
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: (02362) 228847 / टोल फ्री 1077 / 7498067835
- जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष: (02362) 228614 / 8275776213 / हेल्पलाईन 112
- जिल्हा रुग्णालय: (02362) 228901
- महावितरण नियंत्रण कक्ष: 7875765019
- दोडामार्ग: (02363) 256518 / 7558673468
- सावंतवाडी: (02363) 272028 / 9420914524
- वेंगुर्ला: (02366) 262053 / 9420851805
- कुडाळ: (02362) 222525 / 8275223142
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.







