पोईप (वार्ताहर)
मालवण तालुक्यातील मसदे विरण बाजार येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून याच दिवशी श्री देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ, मळगावचा ‘श्री संत बाळूमामा’ नाटक, तर २ एप्रिल रोजी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुरचा ट्रिकसीनयुक्त ‘पृथ्वी कंकण’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







