राज्यात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे—अशोक खरात. भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणाने आता सोशल मीडियासह गुगल सर्चवरही धुमाकूळ घातला आहे.
गेल्या अवघ्या ७२ तासांत Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या नावांमध्ये अशोक खरात अव्वल ठरले आहेत. विशेष म्हणजे, १७ मार्चपर्यंत या नावाचा कुठलाही ठसा सर्च ट्रेंडमध्ये नव्हता. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच या प्रकरणाने सर्चचा उच्चांक गाठला.
२० मार्च रोजी गुगल ट्रेंड्समध्ये खरात यांच्या नावाने ‘१००’ हा सर्वोच्च स्कोअर गाठत ‘ब्रेकआऊट’ श्रेणीत नोंद झाली. २३ मार्चपर्यंत हा ट्रेंड कायम राहिल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील नाशिक शहरातून सर्वाधिक सर्च झाले असून त्यानंतर संभाजीनगर, मुंबई आणि पुणे या शहरांचा क्रमांक लागतो. म्हणजेच, हे प्रकरण आता राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.
नेटिझन्स ‘५८ व्हिडिओ’, ‘खरात न्यूज’ आणि ‘बॅकग्राउंड’ या कीवर्ड्ससह मोठ्या प्रमाणात माहिती शोधत आहेत. यावरून या प्रकरणाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट होते.
एकूणच, भोंदू अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता डिजिटल विश्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत आहे…







