मालवण (प्रतिनिधी)
वातावरणातील बदलांमुळे आंबा, काजू या हंगामी पिकांचा मोहोर खराब झाल्याने जिल्ह्यातील बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ पंचनामा करुन बागायतदारांना नुकसान भरपाई जाहीर करून न्याय द्यावा, अन्यथा प्रशासनाच्या व राज्य सरकारच्या निष्काळजी कार्यप्रणालीसाठी या गुढीपाडव्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खराब झालेल्या मोहोराची माळ लावण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन अरविंद मोंडकर यांनी जिलाधिकाऱ्यांना सादर केले आहे. झाडावर येणारा मोहोर मोठ्या प्रमाणात वातावरणातील बदला मुळे खराब झाल्याने आर्थिक दृष्ट्या कोट्यावधीचा फटका जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना झाला आहे. मालवण, वेंगुर्ला, देवगड व इतर तालुक्यातील अनेक बागायती ठिकाणी मोहोर काळा पडला आहे तसेच गळून पडल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षा नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात वातावरणाचा फटका या पिकांना बसून बागायतदाराच्या हाताशी आलेलं पीक नैसर्गिक बदलामुळे मातीमोल होणार असून जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वर्गास हे परवडणारे नाही, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.
झाडांना योग्य फळ लागावे म्हणून घेण्यात येणारी मेहनत लागणारी आर्थिक तडजोड, खत-पाणी फवारणीसाठी लागणारे शारीरिक कष्ट व मजुरी आणि यासाठी काढलेली कर्जे यासारख्या बाबींचा ताळमेळ पाहता बागायतदार शेतकरी यांस आर्थिक फटका बसणार आहे. बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तात्काळ तहसीलदार व तलाठ्याना आपण स्पॉट पंचनाम्याचे निर्देश द्यावेत व पाहणी करुन यावर अहवाल बनवून येत्या आठवड्यात गुढीपाडव्या पूर्वीच शेतकरी बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तात्काळ भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही अरविंद मोंडकर यांनी म्हटले आ







