मालवण (प्रतिनिधी)
मालवणी संस्कृतीतील ‘कनो घालणे’ ही एक सुंदर आणि परंपरेचा अमूल्य ठेवा जपणारी कला आहे. देवली गावातील महिला व मुली यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि ही परंपरा पुढील पिढीपर्यंत जतन व्हावी, या हेतूने आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने दि. ११ मार्च रोजी वरची देवली येथे मालवणी पारंपारिक ‘कनो घालण्याची स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
देवली गावातील सर्व वयोगटातील महिला व मुलींसाठी खुली आहे. ही स्पर्धा सायंकाळी ४ वा. वरची देवली येथील प्रिया नरेश चव्हाण यांच्या घरी होणार आहे. प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात येतील तसेच सर्व सहभागीना भेटवस्तू दिली जाईल. कनो घालण्यासाठी लागणारे खडू इत्यादी साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. नाव नोंदणीसाठी डॉ. सुमेधा नाईक – 9404924678 यांच्याशी संपर्क साधावा. देवली गावातील जास्तीत जास्त महिला व मुलींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





