मालवण, प्रतिनिधी :
नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने तसेच मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त गुरुवार, दिनांक 13 मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी 5 वाजता श्री देव रवळनाथ मंदिर नजीकच्या मैदानावर रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाच्या संघाला रोख रुपये 10,000 आणि चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 6,000 आणि चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी रोख रुपये 2,000 देण्यात येणार आहेत. तसेच प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघांना कै. शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य स्मृती चषक प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांना रोख रक्कम व स्मृती चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक कबड्डी संघांनी आपली नावे नितीन हडकर (मो. 7249357239) किंवा दत्तप्रसाद पेडणेकर (मो. 9421145827) यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.






