बारामती :
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर मा. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते मा. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार तसेच पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत मनःपूर्वक सांत्वन व्यक्त केले. संदेश पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकेकाळी बळ दिले होते. पारकर आणि पवार कुटुंबियाचे भावनिक नाते आहे. आज अजितदादांच्या जाण्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवार प्रेमींच्या संवेदनशील भावना यावेळी संदेश पारकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मा. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी ईश्वराने पवार कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य व हे दुःख सहन करण्याचे बळ द्यावे, अशी भावनिक प्रार्थना व्यक्त केली.







