कुडाळ | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस कुडाळ–मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब उपस्थित राहून सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान महायुतीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करत जनतेचा विश्वास संपादन करून ठाम विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संघटन, रणनीती आणि विजयाचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक श्री. संजयजी मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, श्री. राजू राऊळ, श्री. अशोक सावंत, श्री. संजय वेंगुर्लेकर, श्री. विनायक राणे, शिवसेना महिला सेना प्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. संजय पडते, श्री. दादा साईल तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बैठक आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या तयारीला दिशा देणारी ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.







