मालवण : (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मालवण यांच्या वतीने रविवार दि. २६ जानेवारी रोजी मालवण भरड येथील लिलांजली हॉल येथे प्रजासत्ताक दिन तसेच मालवण ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता ध्वजवंदनाने होणार आहे. या प्रसंगी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार असून, सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.








