मालवण : (प्रतिनिधी)
मालवण रेवतळे येथील श्री महापुरुष पार येथे बालगोपाळ मित्रमंडळ, रेवतळे यांच्या वतीने मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून दुपारी २ वाजल्यापासून भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसीनयुक्त ‘एकपदा त्रिमूर्ती अर्थात पृथ्वीकंकण’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
शुक्रवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बालगोपाळ मित्रमंडळ, रेवतळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.







