कणकवली | प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथे शिवसेना शाखेत मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण केला.
यावेळी तालुकाप्रमुख केतन पारकर, राजु राठोड, सचिन सावंत, नगरसेवक संकेत नाईक, तेजस राणे, धीरज मेत्री, राजु राणे, ईश्वर आमसकर, महेश कोठे, अरुण पखव, अजित कणगावकर, रवी भंडारे, लक्ष्मण हळदीकडे, दिव्या सालगावकर, रोहिणी पिल्लणकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला. त्यांच्या विचारांवर आधारित समाजकार्य व जनहिताची चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.





