मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील जत्रेचा वड येथे बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजेने होणार असून, दुपारी १२ वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ९.३० वाजता भजनप्रेमी स्व. अनिल जयवंत हडकर व राजा बैल यांच्या स्मरणार्थ
अनिकेत अनिल हडकर व स्वराज अनिकेत हडकर पुरस्कृत तिरंगी भजन बारी सामना रंगणार आहे. या तिरंगी भजन बारीत बुवा विजय (गुंडू) सावंत, बुवा संदीप लोके व बुवा संदीप पुजारे यांच्यात रंगतदार सामना होणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







