मालवण | दि. प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना शाखा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेस शिवसेना उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथ प्रमुख, तसेच युवासेना, महिला सेना व युवती सेनेचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांनी केले आहे.
या सभेत आगामी संघटनात्मक कामकाज व सद्यस्थितीबाबत चर्चा होणार असून कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






