मालवण (प्रतिनिधी) :
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्रीपाद शंकर ऊर्फ बाळासाहेब पंतवालावलकर यांचे दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरून येणे अशक्य असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दिवंगत बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गंगुबाई देसाई कन्याशाळा हॉल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेत उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. किरणजी ठाकूर आणि कार्याध्यक्ष श्री. साईनाथजी चव्हाण यांनी केले आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे, अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे





