सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विसंवाद असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देणारे चित्र सध्या स्पष्टपणे समोर येत आहे. राणे समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकवटले असून, सोशल मीडियावर झळकणाऱ्या स्टेटस आणि पोस्टमुळे जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः वादळ निर्माण झाले आहे.
“जय नारायण…”, “आमची ओळख राणे कुटुंबीय”, अशा ठसकेबाज टॅगलाईनसह व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्टर आणि बॅनर्स झपाट्याने व्हायरल होत आहेत. यामुळे राणे समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
दरम्यान पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक … रोजी बांदा ते कणकवली दरम्यान भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर प्रचंड चर्चिल्या जात आहेत . कणकवली आणि कुडाळ परिसरात झालेल्या बैठकीत या रॅलीचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून, हजारो वाहनांचा ताफा या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे या रॅलीत खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे एकत्रित आणि जल्लोषात स्वागत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. रॅलीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर सायंकाळी ५ वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुती न झाल्याने राजकीय कटुता निर्माण झाल्याच्या चर्चा काही काळ जिल्ह्यात सुरू होत्या. निकालानंतर पक्षापेक्षाही राणे पॅटर्नच राज्यात चर्चिला गेल्याने पुन्हा एकदा जय नारायण ही घोषणा देत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यात आहे होते.
आता मात्र अनेक समर्थकांचे व्हॉटसअप स्टेटस “जय नारायण…”, “आमची ओळख राणे कुटुंबीय”,असे असल्याने हाच हॅशटॅग पुढील दोन दिवसात अनेकांच्या व्हॉटसअपवर येण्याची शक्यता बोलण्यात येत आहे.
“खरा गुलाल उधळायची वेळ आली आहे,” असा विश्वास व्यक्त करत राणे समर्थक सज्ज झाले असून, सिंधुदुर्गच्या राजकारणात उद्याचा दिवस निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आता या शक्तीप्रदर्शनातून कोणता राजकीय संदेश जातो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.






