मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना वरळी विधानसभा मध्यवर्ती कार्यालयात कुडाळ–मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे यांनी शिवसैनिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेत संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
या संवादादरम्यान प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यांत असलेली लढाऊ भावना, मनातील निष्ठा आणि पक्षकार्यासाठीची तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी वरळी विधानसभा विभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री. दत्ताजी नरवणकर, वरळी विधानसभाप्रमुख श्री. प्रशांत गवस, शिवसेना–महायुतीच्या प्रभाग क्रमांक १९७ च्या उमेदवार सौ. वनिता ताई दत्ताराम नरवणकर आणि प्रभाग क्रमांक १९८ च्या उमेदवार सौ. वंदना ताई गवळी यांच्यासह निष्ठावान शिवसैनिक, वरिष्ठ पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.





