मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार गणेश लव्हे यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्त मालवण शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार श्री. लव्हे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मालवण शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी तहसीलदार श्री. गणेश लव्हे यांचे स्वागत करत मालवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. तहसीलदार श्री. लव्हे यांनीही नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याची ग्वाही दिली.
या सत्कारप्रसंगी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, कुडाळ–मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ–मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर उपस्थित होते. तसेच मालवण शहरातील नगरसेवक सौ. मेघा सावंत, सौ. पूनम चव्हाण, श्रीम. शर्वरी पाटकर, श्रीम. नीना मुंबरकर, सौ. अश्विनी कांदळगांवकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अखिलेश शिंदे, जाबीर शेख, तेजस लुडबे, अनिल कांदळकर, शेखर गाड तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त तहसीलदार श्री. गणेश लव्हे यांच्या कार्यकाळात मालवण तालुक्यातील प्रशासन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व विकासाभिमुख राहील, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.






