मालवण / प्रतिनिधी :
सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे साहेब, कुडाळ–मालवणचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांच्या उपस्थितीत आज वाळू व्यवसायिकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील वाळू लिलावाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान वाळू लिलाव प्रक्रियेमुळे वाळू व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय अडथळे व प्रत्यक्ष कामकाजात निर्माण होणारा त्रास याबाबत पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी सखोल माहिती घेतली. व्यवसायिकांच्या समस्या समजून घेत लिलाव प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि व्यावसायिकांना दिलासा देणारी कशी करता येईल, यावर सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील वाळू व्यवसाय हा कायदेशीर चौकटीतून सुरळीत चालावा, तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील, असा विश्वास दिला. आमदार निलेश राणे यांनीही व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीनंतर जिल्ह्यातील वाळू व्यवसायिकांनी कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे जाहीर आभार मानत समाधान व्यक्त केले. वाळू लिलावाबाबत सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा यावेळी व्यवसायिकांकडून व्यक्त करण्यात आली.





